नवी दिल्ली | शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
या कायद्यातील तरतुदींना आक्षेप असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग अवलंबावा, असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय.
मी शेतकरी नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी ही कोंडी फोडावी. सरकारनं चर्चेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यांच्या शंकेचं निराकरण करण्यात येईल, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही होत आहे. त्यात देशात कोरोनाचं संकट आहे. सामान्य जनताही भरडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं, असंही नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”
शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे
‘या’ जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता!
भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
फिटनेस चाचणीमध्ये रोहित शर्मा पास; ऑस्ट्रेलियाला होणार रवाना