Agriculture News | रासायनिक खतांच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत आणि आता खत उत्पादक कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढ केली आहे. 1 जानेवारीपासून खत उत्पादक कंपन्यांनी नवी दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. अगोदरच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही आणि त्यात आता खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शेतात पिकाला खत टाकू का नको?, अशा संभ्रमात शेतकरी आहेत. (Agriculture News)
खरीप व रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खतांशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खतांच्या किमती कितीही गगनाला भिडल्या तरी उसनवारी, पैसे उचलून खते खरेदी करावीच लागतात. मागील दहा वर्षांच्या काळात खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्या तुलनेत भांडवली खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. शेती करायची कशी?, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार कधी?-
वर्षभर शेतात राब राब करायचे, थंडी-उन्हाची पर्वा न करता दिवस-रात्र कष्ट करायचे. निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न घ्यायचे, निसर्गाने अवकृपा केली तर आर्थिक भुर्दड सोसायचा. निसर्ग साथ देत नाही व शासनही जवळ करीत नाही. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले खरे; पण शेतकरी व शेती व्यवसायाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढती महागाई याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.
खरीप हंगामात पीक चांगले आले नाही. रब्बी हंगामात आता खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (Agriculture News)
शेणखत व ऊस पाचट यांचा वापर करा
शेणखत व ऊस पाचट यांचा वापर करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करावा व कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
खतांच्या किमती काय आहेत?
१०:२६:२६ पूर्वीचे भाव १३५० व वाढलेले भाव १५९०
१०:२६:२६ चे पहिले भाव १४७० व वाढलेले भाव १७९०
२०:२०:० चे पहिले भाव १३०० व वाढलेले भाव १३५०
१४:३५:१४ चे पहिले भाव १७०० तर वाढलेले भाव १८०० (Agriculture News)
खताचे सरासरी भाव २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. ट्रान्सपोर्ट खर्च व रॉ मटेरियल कॉस्टमुळे भाव वाढले असावेत.
News Title : Agriculture News fertilizer price hike
महत्वाच्या बातम्या –
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू
नागपूर शहरातील पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार
आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार
पुण्यात कुत्र्यांच्या तोंडात मृतदेहाचा तुकडा?; पालिका म्हणते, ‘तो तर पावाचा तुकडा!’
राज्यातील ‘या’ भागाला अवकाळी पावसाचा इशारा!