आधुनिक शेतीचा नवा आदर्श! सांगलीच्या पठ्ठ्यानं केली कमाल, 25 गुंठ्यात घेतलं 4 लाखांचं उत्पन्न

Agriculture News Sangli Youth Earns 4 Lakhs from Chilli Farming Using Modern Techniques

Agriculture News | सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा (Walwa) तालुक्यातील आष्टा (Ashta) येथील एका २६ वर्षीय तरुणाने आधुनिक पद्धतीने (Modern Farming) शेती करत मिरची पिकातून (Chilli Crop) भरघोस उत्पन्न (Income) मिळवले आहे. (Agriculture News)

अवघ्या २५ गुंठे क्षेत्रात त्याने तब्बल ४ लाखांचे उत्पन्न मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण कृषी पदवीधर (Agriculture Graduate) असून त्याने वडील आणि तज्ज्ञांच्या (Experts) मार्गदर्शनाखाली ही किमया साधली आहे.

प्रणव शिंदे (Pranav Shinde) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या २५ गुंठे शेतामध्ये हिरव्या मिरचीचे (Green Chilli) पीक घेतले. लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची योग्य मशागत (Tillage) केली. त्यासाठी त्यांनी सहा ट्रॉली शेणखत (Manure) वापरले.

तसेच उभी-आडवी नांगरट (Ploughing) करून बेड (Raised Beds) तयार केले. सप्टेंबर महिन्यात त्यांनी रोपवाटिकेतून (Nursery) ७८६ सेमीनस (Seminis) जातीची सुमारे चार हजार मिरचीची रोपे (Chilli Seedlings) खरेदी केली.

योग्य नियोजन आणि व्यवस्थापन (Proper Planning and Management)

प्रणव यांनी रोपांची लागवड पाच बाय सव्वा फुटावर केली. या मिरचीला ठिबक सिंचनाद्वारे (Drip Irrigation) नियमित पाणी दिले. तसेच, मिरचीवर बुरशी (Fungus), करपा (Blight), अळी (Pest) या रोगांसाठी वेळोवेळी कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी केली. मिरचीच्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी रणजीत तळप (Ranjit Talap) यांचे मार्गदर्शन घेतले.

रोप लागवडीनंतर वीस दिवसांनी काठी आणि तारेच्या सहाय्याने मिरचीच्या झाडांना आधार दिला. तणांचा (Weeds) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचा (Mulching Paper) वापर केला. तसेच, पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी संपूर्ण पिकाला ठिबक सिंचन (Drip Irrigation) पद्धतीने पाणीपुरवठा केला. (Agriculture News)

तरुण शेतकऱ्याचा आदर्श (Role Model)

प्रणव शिंदे (Pranav Shinde) यांनी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या आधारे मिरची पिकातून (Chilli Crop) भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यांचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी, विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी (Inspirational) आहे. (Agriculture News)

Title : Agriculture News Sangli Youth Earns 4 Lakhs from Chilli Farming Using Modern Techniques

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .