महाराष्ट्र मुंबई

शिवप्रेमींचा संताप पाहून अग्रिमा जोशुआनं मागितली माफी; वादग्रस्त व्हिडिओही केला डिलीट

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांची स्टँडअप शोमध्ये थट्टा करणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमा जोशुआचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. अग्रिमाच्या या व्हिडीओवर संबंध महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी जोर धरत असताना आता अग्रिमा जोशुआनं ट्विटरद्वारे माफी मागितली आहे.

ट्विटरवर माफी मागताना अग्रिमा म्हणाली की, “महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तमाम शिवप्रेमींची मी जाहीर माफी मागते. माझ्या वक्तव्यामुळं सर्वांची मनं दुखावली गेली. तसंच तो व्हिडीयो देखील आता डिलिट केला आहे.”

दरम्यान, अग्रिमा जोशुआने मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल विनोदातून टीका केली. ही टीका करत असताना तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले.

ट्विटरवर देखील काल या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असा विनोद करणं संतापजनक आहे, अशा भावना ट्विटरवर युजर्स कालपासून मांडत आहेत.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे?, शरद पवारांनी ठेवलं अचूक बोट!

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

2014 च्या भाजप-शिवसेना सरकारवर शरद पवारांचं खळबळजनक भाष्य, म्हणाले…

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या