शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी

Agristack scheme unlikely to gain momentum

Agristack scheme जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला आधार आणि मोबाइल क्रमांक जोडण्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या ‘अॅग्रीस्टॅक’ या योजनेवर गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. परिणामी 15 डिसेंबरपासून सुरू होणारी ही योजना अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. (Agristack scheme)

योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे

राज्य संघटनांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे. भूमी अभिलेख विभाग, तसेच राज्य सरकारकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नसल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे.

योजनेचा उद्देश काय?

भूमी अभिलेख विभाग राज्यात ‘अॅग्रीस्टॅक’ ही योजना कृषी विभागाच्या मदतीने राबविणार आहे. यात शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकऱ्याचे नाव, त्याच्या जमिनीची माहिती व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्याकडील जमिनीचे नेमके क्षेत्र कळू शकणार आहे. (Agristack scheme)

अधिकार अभिलेखांना आधार जोडणी

त्यासोबतच अधिकार अभिलेखांनाही आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने केंद्र सरकारकडे दिला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यासोबतच अधिकार अभिलेखाला आधार जोडणीचे काम राज्यात सुरू होणार आहे.

योजनेचे फायदे

जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत होणाऱ्या व्यवहारांमध्ये संमती असण्याशिवाय संबंधित शेतकऱ्याची पडताळणी करता येत नव्हती. त्यामुळे अनेक गैरव्यवहार होत होते. आपली जमीन विकल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याला त्याची माहिती मिळत होती. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. फसवणुकीचे असे अनेक प्रकार राज्यात होत होते. (Agristack scheme)

शेतकऱ्यांचे संरक्षण

मात्र, आता अधिकार अभिलेखाला आधार जोडल्याने अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकऱ्याला असावी, यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून एसएमएसद्वारे ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी दिल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याची पडताळणी करून व्यवहार पूर्ण होणार आहे. (Agristack scheme)

News Title :  Agristack scheme unlikely to gain momentum
महत्वाच्या बातम्या –

आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा

मनसे आणि भाजपची युती होणार? ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“… तर सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

आताची सर्वात मोठी अपडेट!, वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळणार?

मुंबईकरांना भुयारी मेट्रो मार्ग मिळणार!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .