अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणात विजयमाला माने यांची चौकशी करण्यात येणारे. विजयमाला माने या बालविकास प्रकल्प अधिकारी असून त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणारे.
दरम्यान चौकशीकरता पोलीस माने यांच्या घरी गेले असता त्या घरी नव्हत्या, तसंच त्यांचा फोन देखील बंद होता. त्यामुळे सध्या त्यांचा देखील शोध सुरु असल्याची माहिती आहे.
जरे यांची हत्या झाली त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये माने होत्या. या घटनेनंतर माने यांनी गाडीने दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांचा जबाब पोलिसांसाठी फार महत्त्वाचा आहे.
30 नोव्हेंबर रोजी रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. चौकशीअंती पत्रकार बाळासाहेब बोठे याने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम
“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”
“पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यांनी आता हिमालयात जायला हवं”
धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…
दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र