Ahamdabad Plane Crash | एअर इंडियाच्या (Air India) भीषण विमान अपघातानंतर, अपघाताची कारणे शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ बचाव पथकाला सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समधील डेटाचे विश्लेषण करण्यासाठी नवी दिल्ली येथे एका अत्याधुनिक प्रयोगशाळेचे काही काळापूर्वीच उद्घाटन झाले होते. या अपघाताच्या तपासात ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावेल.
‘ब्लॅक बॉक्स’ रहस्य उलगडणार?
अहमदाबाद-लंडन विमान (Ahamdabad Plane Crash) दुर्घटनेच्या तपासात एक मोठी आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. अपघाताचे रहस्य उलगडणारा ‘ब्लॅक बॉक्स’ इतका जास्त खराब झाला आहे की, त्यातील डेटा भारतात रिकव्हर करणे शक्य नाही. त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ‘नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड’ (NTSB) च्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
अपघातावेळी (Ahamdabad Plane Crash) निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्सचे अंतर्गत भाग वितळले आहेत. अशा स्थितीतून डेटा काढण्याचे प्रगत तंत्रज्ञान फक्त NTSB कडे आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा तपास होणार असला तरी, ब्लॅक बॉक्सच्या या स्थितीमुळे अपघाताचे नेमके कारण समोर येईल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
ब्लॅक बॉक्सचे कार्य आणि नवी तपासणी प्रयोगशाळा
ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder – CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder – FDR) असे दोन महत्त्वाचे घटक असतात. सीव्हीआरमध्ये कॉकपिटमधील संवाद, रेडिओ कॉल्स आणि इतर आवाज रेकॉर्ड होतात. अपघातग्रस्त बोइंग ७८७ (Boeing 787) विमान २०१४ मध्ये तयार झालेले असल्याने, त्याच्या सीव्हीआरची क्षमता दोन तासांची असण्याची शक्यता आहे, कारण २५ तासांच्या रेकॉर्डिंगचा नियम २०२१ नंतरच्या विमानांसाठी लागू आहे.