पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील अतिक्रमणांना आता आळा बसणार!

पुणे | पुणे शहरात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पाच परिमंडळ कार्यालयांतर्गत 15 स्वतंत्र टीम कार्यान्वित करण्यात आल्या असून, कारवाईचा वेग वाढविण्यात येणार असल्याचं महापालिकेने बुधवारी स्पष्ट केलं आहे.

अधिकृत फेरीवाल्यांचं पुनर्वसन अद्याप रखडलं असतानाच, त्यांची संख्या वाढत आहे. या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने पुढील 15 दिवसांत मोठ्या स्वरूपात कारवाईचे नियोजन केलं आहे, असं अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितलं आहे.

प्रत्येक परिमंडळ कार्यालयांतर्गत तीन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांच्याकडून संबंधित भागांत अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचंही माधव जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई केली जाणार असून, रस्ते आणि पदपथ पूर्णत: अतिक्रमणमुक्त करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सिंहगड रोडवरील राजाराम पूल ते फनटाइम दरम्यान सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठीच्या प्रस्तावाला महापालिकेनं मान्यता दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या