अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची बिविरोध निवड झाली. राष्ट्रवादी, मनसे आणि बंडखोर उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतले. 

श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून तसेच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी केली होती. 

दरम्यान, छिंदमच्या वक्तव्याचं प्रायश्चित्त म्हणून भाजपने या निवडणुकीत उमेदवार न देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेचा उपमहापौरपदाचा मार्ग मोकळा झाला.