शाळकरी मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिघांना फाशी

अहमदनगर | पारनेर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे अशी याप्रकरणातील दोषींची नावं आहेत. 

ऑगस्ट 2014 मध्ये पारनेरच्या आळकुटीमध्ये परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीची हत्या केली होती. 

याप्रकरणी पोलिसांनी चार दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच अण्णा हजारेंच्या मागणीनंतर विशेष सरकारी वकील म्हणून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात आली होती.