Top News देश

“आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल”

नवी दिल्ली | राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला. विरोधकांचा गदारोळ सुरू असताना आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली.

विधेयकांना मंजुरी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचं काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितलं आहे.

आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. उपसभापतींनी लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवं. मात्र या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहचवलं आहे, असं अहमद पटेल यांनी म्हटलंय.

दरम्यान, ज्या प्रकारे ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. ते लोकाशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. 12 विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, असं देखील अहमद पटेल यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या