बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किसी को भी नही बक्षेंगे’; अहमदनगर जिल्हा रूग्णालय आग प्रकरणी हसन मुश्रीफ आक्रमक

अहमदनगर | अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याने 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर हे सर्व कोरोना रूग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील या घटनेवरून राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असं राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान निधीतून मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क झाला आणि अहमदनगर जिल्हा रूग्णालयात आग लागल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. तर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ व्हेंटिलरच्या मुद्द्याचं समर्थन करताना दिसले. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील या घटनेनंतर हसन मुश्रिफ अहमदनगरला पोहोचले.

रात्री उशीरा अहमदनगरला पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या घटनेची सखोल चौकशी होईल असं आश्वासनही दिलं. या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर निश्चित कारवाई होईल, किसी को भी नही बक्षेंगे, असंही हसन मुश्रिफ म्हणाले.

यावेळी पालकमंत्री मुश्रिफ यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक दिपक पांडेय देखील उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील आग प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय आयुक्तांच्या चौकशीनंतर आरोपींची नावं समोर येतील, असंही पांडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली’; विजय पगारेंचा धक्कादायक खुलास

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी

मुंबई होतंय कोरोनामुक्त! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मोठी बातमी! आसाराम बापू एम्स रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More