बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांची हत्या

अहमदनगर | नगरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची गोळीबार आणि काेयत्यानं वार करून हत्या करण्यात आली आहे. केडगाव भागात असा धक्कादायक प्रकार घडला.

अहमदनगर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर ही घटना घडली. संजय कोतकर आणि वसंत ठुबे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यानी गाड्याची तोडफोड आणि दगडफेक केली आहे. त्यामुळे नगर भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More