राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचं लवकरच विभाजन?

राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचं लवकरच विभाजन?

अहमदनगर | राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरचं विभाजन होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपरगावच्या कोकमठाणमध्ये बोलताना यासंदर्भात सूतोवाच केलंय. 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार हाकताना अडचणी येतात. याचाच विचार करुन नगरचं विभाजन केलं जाऊ शकतं. 

अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी या जिल्ह्यातील नागरिकांनी अनेकदा केली आहे. त्यामुळे लवकर दक्षिण आणि उत्तर अहमदनगर विभाजन झाल्यास आश्चर्य वाटू नये. 

Google+ Linkedin