Ahmednagar Lok Sabha Exit Poll | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहे.
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार
टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Exit Poll) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आघाडीवर असल्याचं चित्र आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe) हे पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय.
साताऱ्यात उदयनराजे पिछाडीवर
सातारा लोकसभा मतदारसंघात देखील कांटे की टक्कर दिसत होती. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. उदयराजे यांनी येथून विजयाचा दावा केला आहे. पण एक्झिट पोलनुसार उदयनराजे पिछाडीवर दिसत आहेत. उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत.
यंदा नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण ते देखील पिछाडीवर आहेत. निवडणुकीत कमी मतदान झाल्याने याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा देखील येथे सुरु आहे.
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र आता नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव
देशात भाजपला किती जागा मिळणार?, प्रशांत किशोर यांचा नवा धक्कादायक अंदाज
महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार?; एक्झिट पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर
अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, एकही जागा जिंकणार नाही!
शिंदेंना धक्का; उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘इतक्या’ जागा जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज