Ahmednagar Loksabha l आज राज्यात लोकसभा निवडणुकीत चौथा टप्पा पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. अशातच निवडणुकीच्या आदल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मतदारांवर पैशांचा पाऊस पडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
भाजपने थेट निवडणूक आयोगाला हाताशी धरले? :
अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मतदारांना पैसे वाट्ल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी यासंदर्भात व्हिडीओ शेअर करत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांवर गंभीर आरोप केला आहे.
अशातच आता अहमदनगर लोकसभा मतदार संघात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडीतील केंद्राचा व्हिडीओ असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
https://twitter.com/Nilesh_LankeMLA/status/1789870873547329962?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1789870873547329962%7Ctwgr%5E546e86c35bcaaf7d4d970f600938cec28f67055e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fahmednagar-lok-sabha-election-campaigning-at-the-polling-station-nilesh-lanke-serious-allegations-against-sujay-vikhe-patil-maharashtra-marathi-news-1281509
Ahmednagar Loksabha l याप्रकरणाचा व्हिडीओ आला समोर :
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील घुमटवाड केंद्रावर भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र हे सर्व निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग असल्याने हे चालणार असेल तर प्रशासनाने देखील भाजपमध्ये प्रवेश करून घ्यावा असे म्हणत उमेदवार निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला आहे.
भाजपने घुमटवाडीच्या मतदान केंद्रामध्ये स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आहे. याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकार धक्कादायक असल्याने अधिकाऱ्याच्या संगनमताने हा प्रकार घडत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच मतदारांना जबरदस्तीने मत करायला भाग पाडत असल्याचा डाव करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मतदान केंद्रावर घडल्याने मतदान केंद्र बंद करण्याची मागणी देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.
News Title – Ahmednagar Loksabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा
मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू
राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका