अहमदनगरमध्ये विखे लाट संकटात; लंकेनी घेतली मोठी आघाडी

Ahmednagar l अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. अहमदनगर लोकसभा निवडणूक हि एक प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत.

डॉ.सुजय विखे पाटील आघाडीवर :

डॉ.सुजय विखे पाटील यांच्या आघाडीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे राजकीय लढतीकडे सर्व डोळे लावून बसले आहेत.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये काटे की टक्कर होत असल्याचं दिसत आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असल्याचं बोललं जात आहे. तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे. तर निलेश लंके हे पिछाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ahmednagar l अहमदनगरमधून सुजय विखे ‘तब्बल’ इतक्या आघाडीवर :

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी आकडेवारीनुसार, 3613 मतांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत सुजय विखे यांना 25653 एवढी मतं मिळाली आहेत. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 22040 एवढी मतं मिळाली आहेत. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत सुजय विखे 4729 मतांनी आघाडी घेतली आहे.

तसेच तिसऱ्या फेरी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे तब्बल 12 हजार मताने आघाडीवर आहेत. तसेच शिर्डीतून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांची आघाडी कायम आहे. त्यामुळे महायुतीचे सदाशिव लोखंडे यांच्यापेक्षा 8,010 मतांनी घेतली आघाडी आहे.

तसेच नगर दक्षिण पाचव्या फेरीत अखेर 9863 मतांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके पिछाडीवर आहेत. अशातच आता सुजय विखे पिछाडीवर आले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अहमदनगरमध्ये अकराव्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके ११ हजारांनी आघाडीवर आहेत.

News Title- Ahmednagar Loksabha Result Updates

महत्वाच्या बातम्या-

आता एका क्लीकवर जाणून घ्या कोणाची आघाडी तर कोणाची पिछाडी?

शरद पवारांचा अजितदादांना दणका; चौथ्या फेरीतही अमोल कोल्हेंची मोठी आघाडी

अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी

अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?

राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?