Nilesh Lanke l अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. निलेश लंके यांनी दिग्गज नेते डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव केला आहे. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशी झाली होती.
Nilesh Lanke l भाजपला मोठा धक्का विखे पाटील पराभूत
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. तसेच महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या.
निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव केल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विखेंच्या पराभवाने भाजप पक्षाला अत्यंत मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रस्थान मानलेल्या या मतदारसंघामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
निलेश लंकेनी उधळला विजयाचा गुलाल :
अहमदनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेते निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या निलेश लंकेनी विजय मिळवला असून सुजय विखेंचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे.
News Title- Ahmednagar Loksabha Nilesh Lanke Win
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!
फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर
भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत
‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा धमाका; ओमराजे निंबाळकर विजयी