वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

अहमदनगर | वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमला आता उपरती झाली आहे. महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तो शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाला आहे.

काही दिवसांपूर्वी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती.

भाजपने त्याला पक्षातून काढून टाकलं मात्र त्याने नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. 

शिवरायांच्या विरोधात वक्तव्य करुन देखील छिंदम विजयी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दरम्यान, त्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि या महापुरुषांच्या आशीर्वादामुळे आपण जिंकल्याचं सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या 

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”