बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नुकसान भरपाईसाठी ठाकरे सरकारकडून मदत जाहीर; पुणे विभागाला मिळणार सर्वाधिक ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई | राज्यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यातील विविध जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरजन्य परिस्थितीमुळं राज्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतपिकांचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 365 कोटी 67 लाख रूपयांची मदत मंजूर झाली आहे. यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ही सर्व मदत तात्काळ बाधितांपर्यंत पोहचेल याची दक्षता घेण्याचे आदेश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसान भरपाईसाठी बाधितांसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रूपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रूपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रूपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रूपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रूपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 665 लाख रूपयांची मदत असणार आहे.

अतिवृष्टीमुळं राज्यातील विविध जिल्हात पूरपरिस्थिती उद्भवली होती. राज्यातील या सर्व पूरजन्य परिस्थितीची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनी पाहणी केली होती. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, मदतीच्या अनुषंगाने महसूल आणि वन मंत्र्यालयाच्या विभागानं मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पूरपरिस्थितीमुळं शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाईकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाखांच्या निधी वाटपाचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More