Top News

निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले…

नवी दिल्ली | दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना आज पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं.

चारही आरोपींना फाशी देण्यापूर्वी त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी चौघांनीही ‘काही नाही’ एवढंच उत्तर दिल्याचं समजतंय. या चौघांनीही शेवटची इच्छा नसल्याचं सांगितलं.

आरोपींनी मागील सात वर्षांमध्ये तुरुंगामध्ये काम करुन कमावलेला पैसा त्यांच्या कुटुंबाला दिला जाणार असल्याचं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यावेळी तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे- नरेंद्र मोदी

22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’… कुणीही घराबाहेर पडू नका- पंतप्रधान मोदी

महत्वाच्या बातम्या-

“असा गुन्हा करण्याचा विचारही कोण करणार नाही अशी भिती तयार करायची असेल तर…”

तुम्ही पापं केली म्हणून कोरोना आला- राखी सावंत

“निर्भयाची आई ही माझी ओळख अभिमानास्पद, आज ती असती तर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या