बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता वेळ आली आहे, मी लखीमपूर खेरी येथे जाणार’; असदुद्दीन औवेसी आक्रमक!

नवी दिल्ली |  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार घडून आला. या हिंसाचारामध्ये अनेक वाहने देखील पेटवण्यात आले आणि आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने हत्या केलेल्यांच्या प्रति एकजूट दर्शवण्यासाठी मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणार आहे. हा घोर अपराध आहे. आता वेळ आली आहे की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि त्यांनी या मंत्र्यास देखील हटवलं पाहिजे, असं असदुद्दीन औवेसी म्हणाले

लखीमपूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे देशात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, समाजवादी पार्टी, राजदसह आणि इतर अनेक देशातील राजकीय पक्षांनी या घटनेवरून लक्ष्य केलं आहे. तर काॅंग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी या शेतकऱ्यांच्या भेटीला निघाल्या असता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर आता शेतकरी नेते राकेश टीकैैत हे गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे रवाना झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘आमच्या शेतकऱ्यांचा…’; लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेवर शरद पवार संतापले!

हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करताना दिसल्या प्रियांका गांधी, पाहा व्हिडीओ

‘जर पोलिसांनी प्रियांका गांधींना सोडलं नाही तर…’; नाना पटोले आक्रमक

शिवलीला पाटीलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांना मोठा धक्का

‘हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके जायेंगे’; खडसेंचा भाजपला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More