Top News

विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट

नागपूर | कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे.

या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची नागपूरला जाऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं आहे.

वैमानिक दीपक साठे हे मुंबईत आपल्या परिवारासोबत राहत होते. तर त्यांचे आई-वडील हे नागपूर येथे राहतात. दीपक साठे यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचं म्हटलं आहे.

आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला. आमचा मोठा मुलगाही सैन्यात होता आणि तोही शहीद झाला. दीपक याला स्वॉर्ड ऑफ ऑनरने गौरवण्यात आले होते. एअरफोर्सचे आठही पुरस्कार त्याला मिळाले होते. रायडिंग, स्विमिंग सर्व गोष्टींमध्ये टॉपवर होता. त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. लहानपणापासून अव्वल होता. एनडीएमध्ये मेडल मिलवलं. पहिला मराठी मुलगा ज्याला एअरफोर्सची सर्व पुरस्कार मिळवली. त्याने दाखवलेल्या समसूचकतेमुळे विमानातील इतरांचे प्राण वाचले, असं दीपक साठे यांच्या आईने म्हटलंय.

 

 

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

कोल्हापुरात खासगी रुग्णालयाला सरकारी ऑडिटरचा दणका, रुग्णाच्या बिलात ‘इतक्या’ लाखांची केली कपात

“मराठा समाज आरक्षण उपसमितीवरून अशोक चव्हाण यांना हटवून या नेत्याची नियुक्ती करा”

‘गर्व असणारच, मुलगा आहे माझा’; केरळ अपघातात मरण पावलेले पायलट दीपक साठे यांच्या आईची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात चौथऱ्यावरुन हटवला; सोशल मीडियावर संताप

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या