देश

एअर इंडियाचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी कर्मचाऱ्यांना पाठवणार विना पगारी सक्तीच्या रजेवर

नवी दिल्ली | कर्जाच्या ओझ्यामुळे ढबघाईस आलेल्या एअर इंडियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. याची झळ आता कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सोसावी लागणार आहे.

एअर इंडियानं काही कर्मचाऱ्यांना विना पगारी पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या मंडळानं एअर लाईन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकानं त्यासाठी परवानगी दिली आहे.

एअर इंडियाच्या या निर्णयाचं एनडीटीव्हीनं वृत्त दिलं आहे. एअर इंडियाच्या मंडळानं एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मंडळाच्या अध्यक्षांना स्टाफमधील नॉन परफॉर्मिंग कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत विना पगारी सक्तीच्या रजेवर पाठवण्याची परवानगी दिली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवायचं यासंदर्भात कंपनीकडून मूल्याकंन केलं जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांची कामासाठीची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाविषयीची गुणवत्ता, कर्मचाऱ्याचे आरोग्य, भूतकाळातील सुट्यांबद्दलचं कर्मचाऱ्याचं रेकॉर्ड कसं आहे, यासह इतर बाबींवर मूल्याकंन केलं जाणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार असून, त्यातून कोणत्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी ताळतंत्र सोडलं ”

‘कोरोना झाल्यास मला सरकारी रूग्णालयातच दाखल करा’; देवेंद्र फडणवीसांनी केला ‘या’ नेत्याला फोन

2019 वर्ल्डकपच्या शेवटी ताण कमी करण्यासाठी बेन स्टोक्सने केलं असं काही…..

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शहा म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या