बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! पुरूषांच्या शुक्राणूवर होतोय ‘या’ गोष्टीचा गंभीर परिणाम

मुंबई | देशात वाहनांची संख्या वाढल्यामुळे तेवढ्य़ा प्रमाणात वायुप्रदुषणातही वाढ झाली आहे. त्याचे मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होताना दिसत आहे. वायु प्रदुषणामुळे इतर रोगचं नाहीत तर पुरूषांमधील शुक्राणुंची संख्या देखील कमी होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. वायुप्रदुषणामुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडीसीच्या संशोधकांना अभ्यासात असे आढळून आले आहे की, वायु प्रदुषणाचा मेंदुमध्ये सुज येऊन शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. गरम हवेचा शुक्राणूंवर परिणाम होतो हे याअगोदरच समोर आलं होतं. प्रदुषित हवेत श्वास घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. वाहनांच्या वायुप्रदुषणामुळे प्रदुषित हवा असलेला श्वास वाहन चालवताना पुरूषांनी घेतल्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होते.

पुरूष आणि स्त्रियांमध्ये अधिक ताणतणावामुळेही प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं होतं. प्रसिद्ध संशोधक झेकांग यिन यांनी म्हटलं आहे की, प्रजनन क्षमतेवर प्रदुषणाचा काय परिणाम होतो याचं आम्ही संशोधन करत आहोत. तसेच संशोधनात आढळले आहे की, जेव्हा उंदराच्या मेंदुतील सुजलेला भाग काढून टाकला तेव्हा त्याच्या शुक्राणूंच्या संख्येत झालेली कमी पुन्हा पुर्वस्थितीवर येऊ लागली.

दरम्यान, युएमएसओएम कार्डिओलॉजी संशोधक चार्ल्स हाँग यांनी म्हटलं आहे की,  वायुप्रदुषणामुळे केवळ लोकांच्या फक्त प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही तर इतर आजार असलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार यांवर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. हवेच्या प्रदुषणामुळे मेंदुला सुज येण्याच्या परिणामामुळे हे सर्व असण्याची शक्यता असते.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवार आणि अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

“मी नशीबवान आहे, माझी मुले ड्रग्स घेत नाहीत, त्यांनी अद्याप…”

उत्सुकता शिगेला! देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी

“पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं”

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More