बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअरलिफ्ट यशस्वी! अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका

नवी दिल्ली | सध्या सगळ्या जगाच्या नजरा अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या हालचालींकडे लागल्या आहेत. तालिबाननं काबूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणी नागरिक पालायन करताना दिसत आहे. तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांची गर्दी काबूल विमानतळावर दिसत होती. अशातच अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात अनेक भारतीय देखील अडकले.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना कशा प्रकारे वाचवता येईल, यावर चर्चा करण्यात आली. अजित डोवाल यांनी स्विस्तर प्लॅन सांगितला. त्यानंतर राहिलेल्या भारतीयांना आणण्याचं काम सुरू झालं.

अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी गेलेल्या C17 एअरक्राफ्टला काबूल विमानतळावर गर्दी असल्यानं उतरता आलं नाही. त्यामुळे एअर इंडियाने ताजिकिस्तानच्या एयनी एअर बेसवर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता C17 ने यशस्वीपणे सर्व भारतीयांना एअरलिफ्ट केल्याची माहिती समोर येत आहे. दोन टप्प्यात हे ऑपरेशन पुर्ण करण्यात आलं आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्यांमध्ये काही भारतीय नागरिक, भारतीय राजदूत, कर्मचारी आणि काही पत्रकारांना अफगाणिस्तानातून आणण्यात आलं आहे. ज्या नागरिकांची माहिती उपलब्ध होती. त्या सर्वांना सोडवण्यात आलं आहे. परंतु आणखी काही भारतीय राहिलेत का? याची देखील माहिती घेतली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, आता संभाजी ब्रिगेड ‘ही’ भेट पाठवणार!

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, उद्याच पत्नीची चौकशी होणार!

भाजपने अमर, अकबर, अँथनी हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहावा- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More