एअरटेलने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! सर्वात स्वस्त प्लॅन लाँच

Airtel Diwali Offer l भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी या वर्षी जुलै महिन्यापासून रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर एअरटेलने त्यांचे अनेक जुने प्लॅन्स त्यांच्या लिस्टमधून काढून टाकले आहेत आणि अनेक नवीन प्लॅन लाँच केले आहेत. दरम्यान आता भारती एअरटेल कंपनीने ग्राहकांना एक दिवाळी गिफ्ट दिलं आहे. ज्यामध्ये कंपनीने 26 रुपयांचा स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

ग्राहकांना मिळणार 1.5GB डेटा :

एअरटेलच्या या नवीन प्लॅनची किंमत 26 रुपये आहे. कंपनीने हा प्लॅन फक्त डेटा पॅकसाठी लॉन्च केला आहे. अनेक वेळा दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत वापरकर्ते डेटा ॲडऑन पॅक रिचार्ज करतात. अशा यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअरटेलने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे, ज्याची किंमत फक्त 26 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5GB डेटा मिळतो.हा डेटा केवळ एका दिवसाच्या वैधतेसह येत आहे. एअरटेल कंपनी यापूर्वी 22 रुपयांचा डेटा ॲडऑन प्लॅन ऑफर करत होती, ज्यामध्ये 1 जीबी डेटा मिळत होता. पण हा प्लॅन केवळ एका दिवसाच्या वैधतेसह आला होता.

Airtel Diwali Offer l बिग डेटा ॲडऑन प्लॅनची किंमत किती :

एअरटेलच्या बिग डेटा ॲडऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर कंपनी 77 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा देत आहे. तर 121 रुपयांच्या डेटा ॲडऑन प्लॅनमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे. एअरटेल प्रमाणे, रिलायन्स जिओ देखील आपल्या वापरकर्त्यांना अशा अनेक डेटा ॲडऑन प्लॅन देत आहे.

मात्र या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर भारताची सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ला वेगाने वाढ करण्याची मोठी संधी मिळाली आहे. यामुळेच BSNL कंपनी केवळ 4G नेटवर्कसह 5G (BSNL 5G) आणण्याची वेगाने तयारी करत आहे.

News Title : Airtel Diwali Recharge Offer

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात 3 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु, ‘या’ जिल्ह्यांना जोडणार

‘या’ चित्रपटामध्ये भारुडातून दाखवली राजकीय स्थिती; ’50 खोके’ अन् बरच काही

तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत ‘या’ जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; राम मंदिरात वाटप

मुलीला कन्या दिनानिमित्त द्या हटके शुभेच्छा; होईल खुश

CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी