बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

AIRTEL धारकांसाठी खुशखबर! ‘या’ प्लॅन्सवर मिळणार 500MB मोफत डेटा

नवी दिल्ली | प्रसिद्ध टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलने (Airtel) त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा केली होती. एअरटेलच्या या घोषणेनंतर तमाम एअरटेल धारकांनी नाराजीचा सुर धरला. कस्टमर्सच्या नाराजीनंतर एअरटेलने आता मोफत डेटा (Free Data) देण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेल कंपनीने त्यांच्या काही ठरावीक प्रीपेड प्लॅनवर (Prepaid Plan) मोफत डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची नाराजी दूर करण्यासाठी एअरटेल आता काही ठराविक रिचार्ज पॅक वर 500MB मोफत डेटा देणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर यासंबंधीची माहिती दिली आहे.

एअरटेल कंपनी त्यांच्या 265, 299, 719 आणि 839 रूपयांच्या प्लॅनवर 500MB डेटा मोफत देणार आहे. एअरटेल कंपनी सध्या 265 रूपयांच्या पॅकमध्ये 1GB मोफत डेटा देते. 299 आणि 719 रूपयांच्या पॅकमध्ये 1.5GB डेटा तर 839 रूपयांच्या रिचार्जमध्ये कंपनी ग्राहकांना 2GB डेटा पुरवते.

आता या रिचार्जवर कंपनी 500MB मोफत डेटा देणार आहे. प्लॅनमधील पुर्ण डेटा संपल्यावर ग्राहकांना हा 500MB डेटा वापरता येणार आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना एअरटेलच्या थँक्स अॅपचा वापर करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ वादळी मुद्द्यांवर होणार चर्चा

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More