बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | देशात नव्याने येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी मोठ्या कपंन्यानी जोरदार तयारी केली आहे. या बाबतीत जीओ आघाडीवर असल्याचं पहायला मिळाले होते. मात्र आता एअरटेलनेही जिओला टक्कर देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एअरटेलने आता 5-जी नेटवर्कच्या चाचणीला सुरूवात केली आहे. शहरांमध्ये 5-जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता दिल्लीजवळील गावात केलेल्या नेटवर्कच्या चाचणीलाही एअरटेलला यश मिळाले आहे.

एअरटेलने याआधी हैदराबादसह काही महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्ये 5-जी नेटवर्कच्या यशस्वी चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर एअरटेलने ग्रामीण भागात 5-नेटवर्क तपासण्यासाठी दिल्लीच्या जवळ असणाऱ्या भाईपूर ब्रामनन या गावात चाचणी केली होती. या चाचणीलाही एअरटेलला यश मिळाले असून त्यामुळे आता एअरटेल जिओला मात देणार का? अशी चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच दुरसंचार विभागाने व्ही, एअरटेल आणि रिलायन्स जिओसह दुरसंचार ऑपरेटर्सना 5-जी नेटवर्कच्या चाचण्यांची परवानगी दिली होती. यावेळी दुरसंचार विभागाने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही 5- नेटवर्कच्या चाचण्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता एअरटेलने ग्रामीण भागात चाचणी केली होती. यासाठी एअरटेलने एरीकसन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. 4-जी नेटवर्कच्या तुलनेत 5- जी नेटवर्क दहापट जास्त डाऊनलोड स्पी़ड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळणार आहे.

भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्यांना दुरसंचार विभागाची परवानगी मिळाल्यानंतर लगेचच जिओने पुणे आणि मुंबई यांसह देशातील मुख्य शहरांमध्ये 5-जी नेटवर्कची चाचणी केली होती. त्यानंतर इतरही दुरसंचार ऑपरेटर्सने चाचण्यांना सुरूवात केली होती त्यावेळी एअरटेेलने शहरांमध्ये नेटवर्कची चाचणी केली होती. त्यामुळे आता एअरटेल आणि जिओ कंपनीमध्ये 5-जी नेटवर्कबाबतीत स्पर्धा रंगल्याची चर्चा सुरू झालीये.

थोडक्यात बातम्या-

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

कायदा मोडणार नाही, पण लखीमपूरला जाणारच; राहुल गांधींचं मोठं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More