बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

नवी दिल्ली | महागाईची झळ देशभर बसत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत असताना पेट्रोल-डिझेल, वीज बिल सारख्या अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडत असताना आता मोबाईल रिचार्जच्या किंमती देखील वाढल्या आहेत. प्रसिद्ध टेलिकॉम सर्व्हिस प्रोवाईडर कंपनी भारती एअरटेलने त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.

एअरटेल कंपनीने त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे एअरटेलचा रिचार्ज आता जवळजवळ 501 रूपयांपर्यंत महागणार आहे. 26 नोव्हेंबरपासून हे नवे ट्रॅफिक दर लागू होणार आहेत. एअरटेलच्या सर्वात महागड्या प्रीपेड प्लॅनमध्ये 501 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर एअरटेलचा बेस प्लॅन हा 21 रूपयांनी महागला आहे.

एअरटेलचा 79 रूपयांचा बेस प्लॅन आता 99 रूपयांना झाला आहे. पण यासोबतच 50 टक्के जास्त टॉकटाईम देखील मिळणार आहे. 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये वाढ होऊन त्याची किंमत 179 रूपये झाली आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2 GB डेटा, 100 मोफत SMS आणि कॉलिंग मिळणार आहे. 28 दिवसांच्या वैधतेसोबत दररोज 100 SMS  आणि 1 GB डेटा उपलब्ध करून देणारा 219 रूपयांचा प्लॅन 265 रूपयांना झाला आहे.

एअरटेलचा सर्वात महागडा प्लॅन 2498 रूपयांचा होता. या प्लॅनच्या दरात 501 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरपासून या प्लॅनची किंमत आता 2999 रूपये असणार आहे. यामध्ये एका वर्षाच्या वैधतेसह 2 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे. दरम्यान, एअरटेल कंपनीच्या प्रीपेड प्लॅन किंमतीत वाढ झाल्यानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्याही दर वाढवण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

‘द वाॅल’चा मास्टरप्लॅन तयार! न्यूझीलंडविरूद्ध ‘या’ रणनितीसह मैदानात उतरणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More