घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच ऐश्वर्या अभिषेकसोबत पोहोचली लग्नसोहळ्यात, ट्विनिंग लुकने वेधलं सर्वांचंच लक्ष

Aishwarya-Abhishek Attend Wedding Amid Divorce Rumors

Aishwarya-Abhishek |  बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (AAishwarya-Abhishek ) यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांना फाटा देत दोघेही दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांच्या मुलाच्या शाही लग्न सोहळ्यात एकत्र हजर राहिले. विशेष म्हणजे, दोघांनीही एकसारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते, त्यामुळे हे जोडपे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

ऐश्वर्या-अभिषेकचा स्टनिंग लूक

2 मार्च 2025 रोजी आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर (Konark Gowariker) याने नियती कनकिया (Niyati Kanakia) सोबत लग्नगाठ बांधली. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते, मात्र सर्वात जास्त चर्चेत राहिले ऐश्वर्या आणि अभिषेक. ऐश्वर्याने व्हाईट कलरचा एलिगंट ड्रेस परिधान केला होता, तर त्याला मॅचिंग  दागिने घालून तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. तिचे नेहमीचे मोकळे केस आणि रेड लिपस्टिकसह ती नेहमीसारखीच मोहक दिसली.

अभिषेक बच्चननेही पांढऱ्या शेरवानीसोबत काळे फॉर्मल शूज घातले होते. दोघांचे काही फोटो इस्कॉन (ISKCON) हरिनाम दास (Harinam Das) यांच्यासोबत व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ते त्यांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. हरिनाम दास यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ऐश्वर्या आणि अभिषेक यांना वृंदावन चंद्रोदय मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

भव्यदिव्य विवाह सोहळा

कोणार्क आणि नियतीचे लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात पार पडले. नियती कनकिया ही प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक रसेश बाबुभाई कनकिया (Rasesh Kanakia) यांची कन्या आहे. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह सोहळा बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या उपस्थितीत पार पडला. (Aishwarya-Abhishek )

Title : Aishwarya-Abhishek Attend Wedding Amid Divorce Rumors

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .