Aishwarya Divorce | गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. इतकंच नाही तर अभिषेकच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीने एंट्री घेतल्याचंही म्हटलं जातंय. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. अशात चाहत्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. ऐश्वर्याने खरंच घटस्फोट घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पण, काळजी करू नका. कारण ही बातमी ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल नाही तर साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतबद्दल आहे. (Aishwarya Divorce)
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या लेकीचा आणि प्रसिद्ध अभिनेता धनुष यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. त्यांनी 18 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज मंजूर झाला असून धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचा विभक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऐश्वर्या-धनुष यांचा घटस्फोट
दोघांनीही काही वर्षांपूर्वीच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विभक्त होण्याची औपचारिक प्रक्रीया त्यांनी पूर्ण केली आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांना एकत्र वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला अधिकृत घटस्फोट मंजूर केला आहे. (Aishwarya Divorce)
वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर, या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचं 2004 मध्ये लग्न झालं. आता घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांना ते एकत्र वाढवणार आहेत.
धनुष अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे, तर ऐश्वर्यासुद्धा आपल्या करिअरमध्ये उत्तमरित्या काम करत आहे. ऐश्वर्या ही चित्रपट निर्माती म्हणून दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. आता दोघेही विभक्त झाले आहेत. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Aishwarya Divorce)
News Title – Aishwarya Divorce with Actor Dhanush
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ
गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीतही तब्बल 10 हजारांची घसरण?; जाणून घ्या दर
पराभव जिव्हारी लागला, शहाजीबापू पाटलांची मोठी घोषणा!