घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!

Aishwarya Rai-Abhishek Bachchan | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही काही न काही कारणांनी सतत चर्चेत असतात. ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये बच्चन कुटुंबापासून विभक्त दिसून आली आहे. बीग-बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, लेक श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कुठेही सोबत स्पॉट होतात. तर, ऐश्वर्या मात्र नेहमीच लेक आराध्यासोबत (Aishwarya Rai-Abhishek Bachchan ) हजेरी लावत असते.

नुकताच अनंत अंबानी आणि राधिका यांचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात देखील ऐश्वर्या लेक आराध्या सोबत दिसून आली. तर, बच्चन कुटुंब वेगळं दिसून आलं. त्यामुळे ऐश्वर्याचे कुटुंबासोबत बनत नसल्याचे म्हटले गेले. त्यानंतर अभिषेक बच्चनने सोशल मीडियावरील घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याने या चर्चा अजूनच वाढल्या.

अभिषेकने पत्नी ऐश्वर्यासाठी घेतलं महागडं गिफ्ट?

जेव्हा विवाहित जोडपे वयाच्या 50 व्या वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात, त्याला ‘ग्रे घटस्फोट’ किंवा ‘सिल्व्हर स्प्लिटर्स’असं म्हणतात. याच संदर्भात ही पोस्ट होती. याच पोस्टला अभिषेकने लाईक केलं होतं. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला चांगलीच हवा मिळाली होती. पाहायला गेलं तर अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. अशात चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अभिषेक याने ऐश्वर्या हिला मोठं गिफ्ट दिल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेकने स्वतःच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारला अॅड केलं आहे. बच्चन कुटुंबात आलेल्या नव्या कारचं थेट कनेक्शन ऐश्वर्या राय हिच्यासोबत जोडलं जात आहे. नुकताच अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो भाचा अगस्त्य नंदा, भाची नव्या नवेली नंदा आणि अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान यांच्यासोबत दिसून(Aishwarya Rai-Abhishek Bachchan ) आला.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम?

हे सगळे एकाच कारमधून डिनर डेटसाठी गेले. त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची नजर ही अभिषेक बच्चन याच्या नव्या कारच्या नंबर प्लेटकडे गेली. हा नंबर ऐश्वर्याच्या आवडीचा असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सगळं काही सुरळीत असून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

अभिषेकच्या नव्या कारचा नंबर 5050 आहे. जो ऐश्वर्याचा आवडता नंबर आहे. ऐश्वर्याची पांढऱ्या रंगाची ‘मर्सिडीज-बेंझ एस-क्लास’ जी आता विकली गेली आहे. त्या कारचा नंबर देखील 5050 होता. इतकंच नाही तर, जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या आयुष्यात आराध्या आली तेव्हा त्याच कारमधून ऐश्वर्या हिने आराध्या हिच्यासोबत घरात प्रवेश केला होता. या व्यतिरिक्त अभिषेकचा वाढदिवसही 5 फेब्रुवारीला असतो. त्यामुळे सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक (Aishwarya Rai-Abhishek Bachchan )यांच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

News Title –  Aishwarya Rai-Abhishek Bachchan in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!

‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर

“गुजरातमधून तडीपार केलेला माणूस..”; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी