Aishwarya Rai | बीग-बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. ऐश्वर्याला सासू जया आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबतही खूपच कमी बघितलं जातं. त्यांच्यात काहीतरी वाद असल्याचंही मागे म्हटलं गेलं.
इतकंच काय तर, ऐश्वर्या (Aishwarya Rai) बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार, ती अभिषेकला घटस्फोट देणार इथपर्यंत या चर्चा झाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. त्यामुळे या सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या. मात्र, आता या चर्चा पुन्हा होऊ लागल्या आहेत.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट निश्चित?
काल 12 जुलैरोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये बच्चन कुटुंब देखील होतं.
मात्र, ऐश्वर्या (Aishwarya Rai)ही लेक आराध्या हिच्यासोबत वेगळी लग्नात सामिल झाली. बच्चन कुटुंबियांना एकत्र आणि ऐश्वर्या – आराध्या यांना वेगळं पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्याने लेकीसोबत लावली हजेरी
विवाहासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन,जया बच्चन, श्वेता नंदा, अगस्त्या नंदा, नव्या नवेली नंदा आणि बीग-बी यांचे जावई सोबत दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत ऐश्वर्या आणि आराध्या दिसलीच नाही. नंतर ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत अभिनेत्री रेखा यांच्यासोबत उपस्थित झाली. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ऐश्वर्या (Aishwarya Rai)आणि बच्चन कुटुंबियांमध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल व्हिडिओवर आता नेटकरी देखील अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘बच्चन असल्यामुळे ऐश्वर्याने लग्न केलं, पण आता बच्चन पासून वेगळी राहाते…’ तर, दुसरा एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘किमान अभिषेकने तरी दोघींसोबत असायला हवं होतं…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या लग्नात कुटुंबासोबत सामिल का नाही झाली?’ असे अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे.
News Title- Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce talks
महत्वाच्या बातम्या-
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तो दिवस आता ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित!
बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा
“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”
“मतदारांना धमकावून विजय?”; नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान
“प्रत्येक आमदाराला 5 कोटींची ऑफर आणि..”; विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा दावा