Aishwarya Rai | प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय ऐश्वर्याच्या वागणुकीबाबत बच्चन कुटुंबांतील काही व्यक्तींनी तक्रार केली होती. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि मुलगी आराध्या कायम सोबत दिसतात. एवढंच नाही तर अनेक कार्यक्रमात ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र पोहोचतात, तर अभिषेक बच्चन हा बच्चन कुटुंंबासोबत येत असतो. त्यामुळे नेटकरी ऐश्वर्या आणि अभिषेकला ट्रोल करताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि अभिषेक जलसा बंगल्यामध्ये पोहोचल्याचं दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओ-
View this post on Instagram
ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि आराध्या यांनी अभिषेकच्या नव्या गाडीतून प्रवास केला. यावेळी तिघे जण मुंबई येथील जलसा या घरी पोहोचले असताना आराध्यासोबत गैरवर्तन झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या व्हिडीओवर युजर्संनी चिंता व्यक्त केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जलसामध्ये जाताना आराध्याची बॉडीगार्डकडून अडवणूक होत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं.
काय म्हणाले नेटकरी?
अनेकांनी आराध्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या लक्षात ही बाब येताच युजर्सने यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक होत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
News Title : Aishwarya Rai and aradhya goes to jalsa bungalow
महत्त्वाच्या बातम्या-
बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल
अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट
हरतालिका व्रताच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!
‘तू वेळ आणि तारीख सांग, मी…’; ‘हा’ भाजप नेता थेट नितेश राणेंना भिडला
गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख