Aishwarya Rai | बीग-बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. ऐश्वर्याला सासू जया आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबत खूपच कमी बघितलं जातं. त्यांच्यात काहीतरी वाद असल्याचंही मागे म्हटलं गेलं.
इतकंच काय तर, ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार, ती अभिषेकला घटस्फोट देणार इथपर्यंत या चर्चा झाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. त्यामुळे या सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या.
ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू
अशात ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि तिची सासूबाई जया बच्चन यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये जया बच्चन असं काही बोलल्या, की ऐश्वर्याला रडूच कोसळलं. ऐश्वर्याची सासू तथा ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन कधीकाळी आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नसत. त्यांचाअसाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सासूबाई जया यांनी केलेल्या कौतुकामुळे ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) डोळ्यात अश्रू आले होते.
हा व्हिडीओ तसा जुना आहे. मात्र, आता तो व्हायरल होत आहे. 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि जया बच्चन फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये गेल्या होत्या. या ठिकाणी जया यांनी आपल्या सुनेबद्दल अशा काही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून ऐश्वर्याला रडू कोसळलं होतं.
View this post on Instagram
जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या होत्या?
“मी एका सुंदर मुलीची सासू झाली आहे, जिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मला तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. मी तुला सांगू इच्छितो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. त्यांचे हे शब्द ऐकून ऐश्वर्याला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने रडू कोसळलं होतं.
ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि जया बच्चन यांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते यावर अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एकत्र बघून चाहते आनंदी होतात. अशात हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
News Title- Aishwarya Rai and Jaya Bachchan video viral
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खान तिसरी बायको आणण्याच्या तयारीत!, करिना कपूरसोबत संबंध बिघडले?
“सध्याचं चित्र पाहून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळालीये”
“..तर 2019 मध्येच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बड्या नेत्याच्या खुलाश्यामुळे खळबळ
‘या’ तीन सवयींमुळे घरात कधीच पैसा टिकत नाही!
“उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, छगन भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू