Aishwarya Rai | बीग-बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. ऐश्वर्याला सासू जया आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबतही खूपच कमी बघितलं जातं. त्यांच्यात काहीतरी वाद असल्याचंही मागे म्हटलं गेलं.
इतकंच काय तर, ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळं होणार, ती अभिषेकला घटस्फोट देणार इथपर्यंत या चर्चा झाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून आली. त्यामुळे या सर्व चर्चा तेव्हा फोल ठरल्या.
ऐश्वर्याला कोसळलं रडू
अशात ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि तिची सासूबाई जया बच्चन यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये जया बच्चन असं काही बोलल्या, की ऐश्वर्याला रडूच कोसळलं. ऐश्वर्याची सासू तथा ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन कधीकाळी आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नसत. त्यांचा आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सासूबाई जया यांनी केलेल्या कौतुकामुळे ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) डोळ्यात अश्रू आले होते.
हा व्हिडीओ तसा जुना आहे. मात्र, आता तो व्हायरल होत आहे. 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि जया बच्चन फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये गेल्या होत्या. या ठिकाणी जया यांनी आपल्या सुनेबद्दल अशा काही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून ऐश्वर्याला रडू कोसळलं होतं.
नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन?
“मी एका सुंदर मुलीची सासू झाली आहे, जिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मला तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. मी तुला सांगू इच्छितो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. त्यांचे हे शब्द ऐकून ऐश्वर्याला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने रडू कोसळलं होतं.
यानंतर सासू जया बच्चन यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं होतं की, त्यांचे सून ऐश्वर्या रायसोबत घट्ट नाते आहे. त्यांना ऐश्वर्या रायबद्दल अनेक गोष्टीबाबत वाईटही वाटलेले आहे. पण, नंतर त्या एकमेकीसोबत बोलून मनमिटाव दूर करायच्या. ऐश्वर्याच्या काही सवयी त्यांना खूप खटकायच्या आणि त्या सवयी ऐश्वर्याने सुधरायला हव्यात, असंही जया बच्चन म्हणाल्या होत्या.
News Title- Aishwarya Rai and Jaya Bachchan
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही
सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…
मोठी बातमी! एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं
ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण
मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम