पती अभिषेकला सोडून ऐश्वर्या राय पोहोचली परदेशी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Aishwarya Rai | बीग-बी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर बच्चन कुटुंबातील कुणीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. स्वतः ऐश्वर्या आणि अभिषेकने सुद्धा यावर काहीच भाष्य केलं नाहीये.

मात्र, ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये बच्चन कुटुंबापासून विभक्त दिसून आली आहे. बीग-बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, लेक श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कुठेही सोबत स्पॉट होतात. तर, ऐश्वर्या मात्र नेहमीच लेक आराध्यासोबत (Aishwarya Rai ) हजेरी लावत असते.

ऐश्वर्याने सोडलं बच्चन कुटुंब?

अशात ऐश्वर्याचा परदेशात एन्जॉय करतानाचा एक फोटो तूफान व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिषेक तिच्यासोबत दिसत नाहीये. त्यामुळे नेटकरी आता वेगवेगळे अंदाज बांधू लागले आहेत. ऐश्वर्या हिच्यासोबत पती अभिषेक बच्चन आणि लेक आराध्या बच्चन दिसत नसल्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

ऐश्वर्या हिचा व्हायरल होत असलेला फोटो न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमधील आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. न्यूयॉर्क येथील एका चाहतीने ऐश्वर्या (Aishwarya Rai ) हिच्यासोबत एक फोटो पोस्ट शेअर केलाय. ऐश्वर्या हिला दुसऱ्यांदा भेटल्यामुळे चाहती आनंदी दिसत आहे. ऐश्वर्याच्या चाहतीने काही वर्षांपूर्वीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerée Reyna (@jereereyna)

ऐश्वर्या रायचा परदेशातील फोटो व्हायरल

या फोटोवर नेटकरी विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एक नेटकरी केमेंट करत म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार पदार्पण करशील अशी आशा आहे, ती अनेक गोष्टींसाठी पात्र आहे…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसते…’, ऐश्वर्या कायम तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका यांचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात ऐश्वर्या (Aishwarya Rai ) लेक आराध्या सोबत दिसून आली. तर, बच्चन कुटुंब वेगळं दिसून आलं. त्यामुळे ऐश्वर्याचे कुटुंबासोबत बनत नसल्याचे म्हटले गेले. त्यानंतर अभिषेक बच्चनने सोशल मीडियावरील घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याने या चर्चा अजूनच वाढल्या होत्या. पण, नंतर अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आल्यानंतर अभिषेक – ऐश्वर्या एकत्र दिसले. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात नेमकं चाललंय तरी काय, याबाबत चाहते देखील संभ्रमात आहेत.

News Title –  Aishwarya rai enjoying holiday in new york

महत्त्वाच्या बातम्या-

“तुला तुडवणारच, कुत्र्यासारखं मारणार”; मनसे नेत्याने काढली अमोल मिटकरींची लायकी

“राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची चाचणी…”; कंगना रनौतचं मोठं वक्तव्य

“आपल्या देशात सेक्सला खूपच कमी महत्व दिलं जातं”; सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या दर

“प्रचंड असह्य वेदना..”; किरण माने आयसीयूमध्ये दाखल