ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

Aishwarya Rai Accident

Aishwarya Rai Accident l कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत कान्सला रवाना झाली. मात्र यावेळी ऐश्वर्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे ऐश्वर्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

ऐश्वर्या रायचा उजवा हात फ्रॅक्चर :

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना बॉलिवूडचे पॉवर कपल म्हटले जाते. दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. आता ऐश्वर्याची अशी अवस्था पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एअरपोर्टवर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दिसली. आईच्या हातावर प्लास्टर असताना मुलगी तिची काळजी घेताना दिसली आहे.

ऐश्वर्या राय दरवेळेप्रमाणे या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. एअरपोर्टवर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत हातात हात घेऊन जाताना दिसली आहे. ऐश्वर्याला या अवस्थेत पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत. आता अभिनेत्रीच्या हाताला ही दुखापत कशी झाली तर ऐश्वर्या रायच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, कारण तिच्या हातावर प्लास्टर होते. त्यामुळे एअरपोर्टवर ऐश्वर्या आराध्याचा आधार घेऊन चालताना दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Aishwarya Rai Accident l आराध्या इतर स्टार किड्सपेक्षा पूर्णपणे वेगळी :

आराध्या बच्चनबद्दल बोलायचे झाले तर ती नेहमीच अगदी साध्या स्टाईलमध्ये दिसते. इतर स्टार किड्सप्रमाणे ती साध्या कपड्यांमध्ये दिसते. ती तिची आई किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत मेकअपशिवाय दिसते. एवढेच नाही तर आता आराध्या मोठी होत असताना ती तिच्या आईसारखी होत असल्याचे चाहते म्हणतात. सध्या आराध्या 12 वर्षांची असून ती शाळेत शिकत आहे. नुकताच तिचा स्टेज परफॉर्मन्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

ऐश्वर्या रायने 2002 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तिच्यासोबत ‘देवदास’चा को-स्टार शाहरुख खान दिसला होता. तेव्हापासून म्हणजे गेल्या 22 वर्षांपासून ती सतत यात सहभागी होत आहे आणि प्रत्येक वेळी ती तिच्या वेगळ्या शैलीने आश्चर्यचकित करते. ऐश्वर्या राय व्यतिरिक्त उर्वशी ढोलकिया, कियारा अडवाणी, शोभिता धुलिपाला, आदिती राव हैदरी आणि जॅकलीन फर्नांडिस यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.

News Title – Aishwarya Rai Hand Fracture

महत्त्वाच्या बातम्या

कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

“मोदीजी आता कांद्यावर बोला”; मोदीजी म्हणतायेत जय श्रीराम

या राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून धनलाभ होईल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचं दुर्लक्ष

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .