Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत. ऐश्वर्याने तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सुंदरपणे हाताळलं आहे. याशिवाय ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाची प्रेमळ सून अशी तिची प्रतिमा कायम ठेवली आहे.
गेल्या काही काळापासून ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्यांनी सध्या सुरू असलेल्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं बिनसलं
बच्चन कुटुंबातील कौटुंबिक कलहाच्या अफवांदरम्यान, एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांच्यातील काहीतरी बिनसल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये, सासू आणि सून ही जोडी पांढऱ्या सूट आणि मॅचिंग दुपट्ट्यात एकाच कारमधून उतरताना दिसत आहे. त्याच्या सोबत अमिताभ बच्चनही सोबत होते.
जया आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) जेव्हा एकत्र फिरत होत्या, तेव्हा जया अगदी टिपिकल सासूसारखं वागत होत्या आणि सुनेला काही सूचना देत होत्या. नंतर जया देखील ऐश्वर्याकडे बघताना दिसली, ज्याकडे ऐश्वर्याने दुर्लक्ष केले. ऐश्वर्या एक शब्दही बोलली नाही.
जया यांनी Aishwarya Rai चं केलं कौतुक
2007 मध्ये ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये हजेरी लावताना जया बच्चन यांना विचारण्यात आलं की, तिची मुलगी श्वेता बच्चनच्या लग्नानंतर सून ऐश्वर्या रायसोबत तिने तिच्या समस्यांबद्दल चर्चा केली का? यावर सर्वांना आश्चर्यचकित करत जया यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आणि सांगितलं की एक यशस्वी डिवा असूनही ऐश्वर्या नेहमी नम्र राहते.
जया म्हणाल्या होत्या की “ती सुंदर आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. मी नेहमीच तिच्यावर प्रेम केलं आहे. मला तिचा हा गुण आवडतो की ती शांत राहते आणि सर्वकाही समजून घेते. आणखी एक सुंदर गोष्ट तिला माहित आहे की आमचे चांगले मित्र कोण आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं
प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव
’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
“…राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य