ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल, लाईक्सचा पडला पाऊस

Aishwarya Rai | ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) ही अभिनेत्री सध्या चित्रपट क्षेत्रापासून लांब आहे. तिचं सध्या वय हे 50 वर्ष असून एखाद्या 19 वर्षीय तरूणीला लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे. तिच्या सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. नुकतीच ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली होती. तेव्हा तिने रॅम्प वॉक देखील केला होता. तिने कान्सचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. (Aishwarya Rai)

ऐश्वर्याचे कान्स फिल्म फेस्टिव्हलचे फोटो व्हायरल

ऐश्वर्याने (Aishwarya Rai) तिच्या सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो मेकअप करतानाचे आहेत. या फोटोची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या फोटोला केवळ सहा तासांमध्ये लाखो लोकांनी लाईक्स केलं आहे. या फोटोला तिने तिच्या L’Oreal ब्रँडला टॅग केल्याचं पाहायला मिळतंय. (Aishwarya Rai)

छायाचित्रांमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती मस्कारा लावताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत अभिनेत्री आरशात पोज देताना दिसते. तर चौथ्या फोटोत ती तिची हेअरस्टाईल करताना दिसत आहे. लॉरियलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरही शेअर करण्यात आली आहेत, ज्यावर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ऐश्वर्या ही दोन लूकमध्ये दिसत आहे. त्यातील पहिला क्रीम आणि ब्लॅक गाऊन होता. तर दुसऱ्या लूकमध्ये ऐश्वर्या ही निळा आणि चांदीच्या गाऊनमध्ये दिसत आहे. अशातच ती आता रेड कार्पेटवर वावरताना दिसली आहे. दरम्यान ऐश्वर्याचे हे फोटो दोन दिवसांआधी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अवघ्या 6 तासांत तब्बल अडीच लाखांहून अधिक लोकांनी पोस्ट लाईक केल्या

तर या पोस्टला अवघ्या 6 तासांत तब्बल अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असल्याची माहिती समोर आली आहे. तर ही पोस्ट करून दोन दिवसांचा कालावधी झाला असून पाच लाखांहून अधिक लोकांनी फोटोला लाईक केलं आहे.

News Title – Aishwarya Rai Post Her Latest Photo On Social Media

महत्त्वाच्या बातम्या

निकालापूर्वीच मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; थेट म्हणाले..

अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांसाठी असणार खास ‘ड्रेसकोड’; लग्नपत्रिका आली समोर

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने घेतला मोठा निर्णय!

पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा

‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत