Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं होतं. आज देखील ऐश्वर्या रायच्या चित्रपटांची चर्चा होत असते. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, अनंत आणि राधिकाच्या लग्नाला देखील ऐश्वर्या आपली लेक आराध्याला घेऊन पोहोचली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी बच्चन कुटुंबाला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा असताना ऐश्वर्याने एक नवा खुलासा केला आहे.
काय म्हणाली ऐश्वर्या?
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि लेक आराध्या न्यू योर्क येथे सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेल्या होत्या. सोशल मीडियावर ऐश्वर्याचे फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले होते. ऐश्वर्या आणि आराध्या भारतात परतल्यानंतर पापाराझींनी ऐश्वर्याला काही प्रश्न विचारले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ऐश्वर्याने उत्तरे देखील दिली.
पुढे काय घडलं?
View this post on Instagram
ऐश्वर्याला उपस्थित पापाराझीने विचारलं की, तुम्ही कशा आहेत? सगळं कसं चालू आहे? त्यावर ऐश्वर्या (Aishwarya Rai) म्हणाली की, सर्व काही ठिक आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्रीला पापाराझींनी ‘गुड मॉर्निंग’ देखील केलं. तर ऐश्वर्याने देखील हसून सर्वांना उत्तर दिलं. यावेळी एकाने ऐश्वर्यासोबत फोटो काढण्यासाठी इच्छा व्यक्त केली असता, ऐश्वर्याने फोटो काढला आणि गाॅड ब्लेस असं म्हणाली.
News Title : Aishwarya Rai says everything is alright
महत्त्वाच्या बातम्या-
OTT वरील ‘हे’ 3 चित्रपट एकटे पाहण्याचं धाडस करू नका; खूप जास्त..
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला सर्व्हिस राहणार बंद
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
सावधान! ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चा नवा विक्रम, रुग्णांना 300 कोटीहून अधिक अर्थसहाय्य