Aishwarya Rai l बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नातं सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. अशातच, ऐश्वर्या रायच्या भूतकाळातील एका प्रकरणाने पुन्हा एकदा जोर पकडलाय. ती एका बड्या उद्योगपतीशी लग्न करण्याच्या विचारात होती, ज्याने बिल गेट्सशी तब्बल 3300 कोटींची डील केली होती.
हा उद्योगपती म्हणजे सबीर भाटिया. 1996 मध्ये त्याने हॉटमेल ही कंपनी स्थापन केली आणि 1998 मध्ये ती कंपनी मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांना विकली. त्यावेळी ही डील 400 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच आजच्या हिशोबाने सुमारे 3300 कोटींमध्ये झाली होती. सबीर भाटिया त्या वेळी टेक जगतातलं मोठं नाव बनला होता.
ऐश्वर्याशी लग्नाची इच्छा, सलमानच्या उपस्थितीत गोंधळ :
सबीर भाटिया याचं नाव अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत जोरदारपणे जोडलं गेलं होतं. त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मला ऐश्वर्याशी लग्न करायचं आहे.” ‘ताल’ सिनेमा पाहिल्यानंतर त्याने तिचं प्रचंड कौतुक केलं होतं. त्याचदरम्यान, डिसेंबर 2001 मध्ये सबीरची सलमान खानशी एका पार्टीत भेट झाली. त्यावेळी सलमानने सबीरला विचारलं, “तूच तो आहेस ना, ज्याला ऐशशी लग्न करायचं आहे?”
या पार्टीतच एक विचित्र प्रसंग घडला. सलमानच्या हातातील सिगरेट सबीरच्या हातावर पडली आणि त्याचा हात जळाला. यावर सलमानने चटकन उत्तर दिलं, “अरेरे… शेवटी ‘ऐश’ तुमच्या हातात आली,” असं म्हणत त्याने माफी मागितली होती.
Aishwarya Rai l ऐश्वर्याव्यतिरिक्तही नावं चर्चेत :
फक्त ऐश्वर्याच नाही, तर सबीर भाटियाचं नाव अमिषा पटेल आणि सुष्मिता सेन यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. मात्र, 2008 मध्ये त्याने आपल्या बालपणीच्या मैत्रिणी तान्या शर्माशी लग्न केलं, जे काही वर्षांतच घटस्फोटात संपलं.
आज सबीर भाटिया एआय आणि क्लीन एनर्जी क्षेत्रात काम करत आहे. पण त्याचा ऐश्वर्या रायशी संबंधित भूतकाळ आजही अनेकांच्या आठवणीत आहे.
News Title: Aishwarya Rai Was Once Set to Marry Billionaire Who Sold Hotmail to Bill Gates