Aja Ekadashi 2024 | सर्व तिथींमध्ये अजा एकादशी व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही तिथी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला दरवर्षी अजा एकादशीव्रत केले जाते. यावर्षी अजा एकादशीचे व्रत आज 29 ऑगस्टरोजी आले आहे. (Aja Ekadashi 2024)
आजच्या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. अजा एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा त्याच्यावर असते. आजच्या या खास दिवशी शास्त्रांमध्ये काही विशेष काम करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे.
अजा एकादशीला ‘हे’ काम करा
अजा एकादशीच्या दिवशी वैवाहिक सुखासाठी तुळशीची पूजा करतात. यासोबतच तुम्ही या दिवशी तुळशी मातेजवळ सौभाग्याच्या वस्तू अर्पण करू शकतात.
अजा एकादशीच्या दिवशी एक नाणे, फुले, अक्षदा भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर त्यांना लाल कापडात बांधून आपल्या ऑफिसमध्ये ठेवा. यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. (Aja Ekadashi 2024)
अपत्य प्राप्तीच्या सुखापासून वंचित असाल तर आज बालकृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि विधीनुसार गोपाळ आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करा.
आज अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि भगवान विष्णूला आवडत्या वस्तू अर्पण करा. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. (Aja Ekadashi 2024)
अजा एकादशी 2024 शुभ मुहूर्त
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा 1:19 वाजता सुरू झाली असून ती उद्या 30 ऑगस्ट रोजी दुपारी 01:37 वाजता संपेल. अशा प्रकारे आज 29 ऑगस्ट रोजी अजा एकादशी व्रत पाळले जात आहे. हे व्रत पाळण्याचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी सकाळी 07:49 ते 08:31 पर्यंत आहे. (Aja Ekadashi 2024)
News Title – Aja Ekadashi 2024
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा कुख्यात गुंडाने केला सत्कार; नेमकं काय समीकरण असणार
लाडकी बहीण योजनेसाठी आता घरबसल्या आधार कार्ड बँकेला लिंक करा; जाणून घ्या स्टेप्स
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन
Jio चा ग्राहकांना आणखी एक दणका?, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?