नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर!

मुंबई | स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावून लढणारा शिवरायांचा शूर मावळा नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात तानाजीची भूमिका साकारणार आहे.

अजय देवगणने या सिनेमाचं पहिलं पोस्टर आपल्या ट्विटरवरुन पोस्ट केलंय. ज्यामध्ये सिनेमाचं नाव ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’, असं असल्याचं दिसतंय. 

हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित होणार आहे. ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या