…ती हिंमत काजोलमध्ये नाही, अजय देवगणनं गुपित फोडलं!

मुंबई | अभिनेता अजय देवगणने एक गुपित जाहीर केलंय. काजोल नव्हे तर त्याची मुलगी न्यासा त्याच्यावर टीका करते, असं त्यानं सांगितलं आहे. 

चित्रपट ‘रेड’च्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकार परिषदेत त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. माझ्या कामावर टीका करण्याची हिंमत काजोलमध्ये नाही, मात्र न्यासामध्ये ती हिंमत आहे, ती माझी सर्वात मोठी टीकाकार आहे, असं अजय देवगण म्हणाला. 

‘रेड’ या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा इलियाना डिक्रुझबरोबर झळकणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलीय.