बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अजय देवगण नेहमीच आपल्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. नुकताच त्याच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अत्यंत धक्कादायक आहे. या व्हायरल व्हिडीओनुसार दिल्लीत मध्यरात्री दोन गटात मोठी हाणामारी झाली होती, या मारामारीच्या व्हिडीओमध्ये अजय देवगणचे नाव समोर येत आहे.

नुकत्याच एका वापरकर्त्याने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती मारहाण करताना दिसून येतो. व्हिडीओ पोस्ट करताना या व्यक्तीने लिहिले की, तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की तो अजय देवगण आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात होता की, या व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेल्या व्यक्तीची शरीरयष्टी अजय देवगणसारखी दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असाही दावा केला गेला आहे की, अजय देवगण या घटनेत असून, त्यावेळी तो नशेच्या अवस्थेत होता. अभिनेत्रीच्या कार पार्किंगवरुन भांडण सुरू आहे.

दरम्यान, ”तान्हाजी’ चित्रपटाच्या प्रमोशननंतर अजय देवगण दिल्लीमध्ये गेलेलाच नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दिल्लीच्या एका पब बाहेरील या व्हिडीओत दिसणारा व्यक्ती अजय नाही. या सगळ्या अफवा आणि खोट्या बातम्या आहेत. असं अजयच्यावतीने त्याच्या टीमने जाहीर केले आहे. या व्हायरल व्हिडीओला उत्तर देताना त्यांनी हे निवेदन जारी केले आहे.

थोडक्यात बातम्या – 

ठरलं तर! पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

एकाच षटकात हार्दिक पांड्याने मारले तीन गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

अखेर 6 दिवस अडकलेलं महाकाय जहाज सुटलं; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान

‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More