अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत

मुंबई | अभिनेता अजय देवगण लवकरच एका शानदार भूमिकेत दिसणार आहे. ‘भूज- द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात ‘स्काॅर्डन लीडर’ विजय कर्णिकच्या भूमिकेत दिसणार आहे, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे. 

1971ला भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत हा ‘भूज- द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्यात भूज विमानतळाची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी ‘स्काॅर्डन लीडर’ विजय कर्णिक आपल्या साथीदारांसोबत तिथे होते.

दरम्यान, विजय कर्णिक यांनी 300 महिलांच्या मदतीने पुन्हा विमानतळाची धावपट्टी तयार केली. यामुळे जवानांना घेऊन विमानं युद्धभूमीवर जाऊ शकली. भूषणकुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य

-डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार

-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”

-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे