आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

Singham Again l अजय देवगणच्या सिंघम अगेन या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळेच या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अजय देवगण पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज :

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा टॉलिवूड अभिनेता अजयनेही या चित्रपटात एंट्री केली आहे. दक्षिण भारतानंतर आता तो हिंदी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा त्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचवेळी तेलुगू अभिनेता अजयही पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनेक तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा, अजय सिंघम अगेनसह हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. ‘सिंघम अगेन’ बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट यावर्षी 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Singham Again l ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिग्गज कलाकार भूमिका बजावणार :

‘सिंघम अगेन’ या ॲक्शन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जम्मू काश्मीरमध्ये होत आहे. यावेळी शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा चित्रपट ॲक्शन आणि मनोरंजक असणार आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग असे स्टार्स दिसणार आहेत. तर अर्जुन कपूर या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगनचा ‘सिंघम अगेन’ हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासंदर्भातप्रत्येक अपडेट जाणून घेतल्यानंतर चाहत्यांची ‘सिंघम अगेन’ या सिनेमाबाबतची उत्सुकता दुप्पट झाली आहे.

News Title – Ajay Devgn Singham Again Update

महत्त्वाच्या बातम्या-

सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल

आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी

पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

या राशीच्या व्यक्तींचा गैरसमजातून वाद वाढू शकतो

बजरंग सोनवणे बीडच्या स्ट्राँगरूममध्ये धडकले, काय घडलं नेमकं?