बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीगोंद्याच्या २ भावांची कमाल… एकाची उपजिल्हाधिकारी तर दुसऱ्याची नायब तहसिलदारपदी निवड!

श्रीगोंदा |  श्रीगोंद्याच्या मढेवडगाव या छोट्याशा गावातील दोन बंधूंनी कमाल केली आहे. एमपीएससीच्या परीक्षेत दोघा भावांनी एकाच वेळेस घवघवीत यश मिळवले आहेत. अजय शिंदे यांची उपजिल्हाधिकारीपदी तर नरेंद्र शिंदे यांची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे.

नरेंद्र आणि अजय यांचे वडिल हे इंजिनिअर आहेत. ते सरकारी कंत्राटं घेतात तसंच घरची शेती देखील करतात तर आई गृहीणी आहे. आम्ही पहिल्यापासून आमच्या मुलांनी अधिकारी व्हावं, हे स्वप्न पाहिलं होतं. मुलांनीही खूप परिश्रम करून आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आमच्या कष्टाचं आता चीज झाल्यासारखं वाटतंय. दोन्ही मुलांनी घवघवशीत यश मिळाल्यानंतर माझी छाती दुप्पट भरून आली आहे, अश्या भावना दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केली.

आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर शिक्षणाबाबतीत कुठलंच बंधन टाकलं नव्हतं. मात्र काहीही करून अधिकारी व्हायचं आणि आपल्या घराचं अन् गावाचं नाव उज्जल करायचं हे स्वप्न होतं. त्यानुसार जिद्दीने अभ्यास करत होतो. शेवटी आम्ही घेतलेल्या कष्टाला यश आल्याचं शिंदे बंधूंनी सांगितलं.

भाऊ-भाऊ म्हटल्यावर आठवतात ती भांडणं मग तुमच्या दोघांची अशी भांडणं झाली नाहीत का? असा प्रश्न विचारल्यावर, “आमची स्पर्धा होती ती अभ्यासात… कोण किती अभ्यास करतो याची आमच्यात शर्यत असायची… शेवटी आम्हा दोघा भावांना यश मिळालं याचा सर्वाधिक आनंद आहे”, असं नरेंंद्र आणि अजय यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”

चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत, अशी करा स्वतःची सुरक्षा!

महत्वाच्या बातम्या-

“मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या”

नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

कोरोनामुळे जगाने योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेतलं- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More